पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मायबोलीचे कलाविष्कार झुलवे झाले लुप्त

मराठी राजभाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) मायबोलीेचे संवर्धन करणारे झूलवे झाले लुप्त 👉 झूलवे म्हणजे झाडीबोलीचे एक भाषा सौंदर्य 👉 होळी, लग्नसोहळ्यात गायले जायचे झूलवे 👉 ग्रामीण पुरुष, महिला गातात झूलवे 👉 झूलव्यांमधून व्यक्त होते प्रेम, समर्पण 👉 नवमाध्यमांच्या गर्दीत लोकगीते होताहेत विरळ              फाल्गुन पौर्णिमेला, मराठी वर्षांतील अगदी शेवटचा सण होळी साजरा केला जातो. नव्याची सुरुवात करण्यासाठी चुकीचे आणि वाईट ते सारेच सोडून नवनिर्मितीचा ध्यास घेण्याचा हा दिवस. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी खेड्यात होळी सणाला एक वेगळाच माहौल असायचा ज्यात झूलवे गायले जायचे. तसेच हरएक व्यक्तीच्या जीवनातील हवाहवासा वाटणारा अशा विवाह सोहळ्यात सुद्धा झुलवे गायले जायचे. निव्वळ प्रथा, परंपरा म्हणून सण-उत्सव साजरे करण्याचा हेतू नसतो. तर त्यातून आपसूकच मायबोलीचे संवर्धन आणि प्रसार सुद्धा होत असतो. आपल्या बोलीत एकमेकांप्रती असलेला प्रेम, लोभ, विनोद आणि राग पण व्यक्त करण्याच्या काव्यांना (लोकगीते) झूलवे म्हणतात. बदलत्या काळात लग्नातील आणि होळीचे झूलवे लुप्त होण्याच्या मार्गावर असून...