पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विसोरा येथे ११९ वर्षांपूर्वीच आरंभले गुरुजींचे ज्ञानदान

समाजात आजही शाळा, शिक्षण आणि गुरुजी यांच्याविषयी आकर्षण, आदर आणि प्रेम कायम आहे. आजपासून तब्बल ११९ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या विसोरा येथील आधीच्या मराठी माध्यमिक आणि आताच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत शंभरावर गुरुजींनी पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांना शिकविले आहे. गुरुला वंदन करण्याचा नव्हे दुसऱ्यांचे जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी धडपड्या आणि समर्पित वृत्तीचा सन्मान करण्याचा दिवस अर्थात राष्ट्रीय शिक्षक दिन. गेल्या एकशे एकोणविस वर्षांत विसोराच्या जि. प. शाळेत ज्ञानदानाचे पवित्र आणि उदात्त कार्य केलेल्या गुरुजींच्या अविस्मरणीय आठवणींना त्यांच्याच शिष्यांनी दिलेला हा उजाळा. राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून या शाळेतून शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांशी बातचीत केली असता त्यांच्या मनात साठलेल्या, जपलेल्या आठवणी आणखीनच ताज्या झाल्या.                    भारत स्वतंत्र होण्याच्या ४५ वर्षांपूर्वीच विसोरा येथे शाळा उभारली गेली. नुकताच एकोणिसावा शतक संपून एक वर्ष झाला होता आणि विसाव्या शतकाच्या दुसऱ्याच वर्षी विसोरा येथे मराठी शा...