पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किन्हाळावासीय जतन करताहेत राष्ट्रसंतांची प्रार्थना

समस्त समाज-राष्ट्राचे सर्वांगीण आरोग्य उन्नत करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी मानवी शिक्षणाची शाळा म्हणजेच सामुदायिक प्रार्थना मानवी समुदायाला अर्पण केली. त्याच सामुदायिक प्रार्थनेची बहुमूल्य अशी शिकवण देसाईगंज तालुक्यात किन्हाळावासीय तब्बल 58 वर्षानंतरही जपत आहेत. विशेष म्हणजे, किन्हाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार-प्रेरणेतून दररोज सामुदायिक प्रार्थना केली जाते. राष्ट्रसंत यांच्या भेटीने आणि स्पर्शाने पावन झालेला किन्हाळा गावात स्मृती दरवळत आहेत.             गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नदी गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा गावातील  मोतीराम ठाकरे यांचे जोगीसाखरा येथील मानकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्या संबंधापोटी मोतीराम ठाकरे यांनी मानकऱ यांना आग्रह केला की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना किन्हाळा गावात, घरी भेट द्यायला आणा. मानकर यांनी मोतीराम यांचा शब्द मानला आणि योगायोगाने राष्ट्रसंत कुरखेडा तालुक्यातल्या आंधळी येथील हरिराम खुणे यांच्या घरी आले होते. महाराजांनी ठरवले की किन्हाळा येथे मोतीराम ठाकरे यांच्या घरी भेट द्यायची म्...