पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शंकरपट म्हणजे झाडीपट्टीचा लोकोत्सव

शंकरपट म्हणजे झाडीपट्टीचा उत्सव. शेतकऱ्यांचा सण. शंकरपट आहे हे माहित होताच शेतकरी कामाला लागायचा. ज्याच्या घरी पटावर धावण्यासाठी बैलजोडी असायची ते स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे बैलांची काळजी घ्यायचे. त्याची वज (पालनपोषण) करायचे. पट जशी पण जवळ येत होती तसतशी बैलाच्या जोड्या आणि त्यांची तयारी, सराव करून घेण्याची जी लगबग होती ती वाढायची. गावात चैतन्य तयार  व्हायचा. झाडीपट्टीतील  गावात शंकरपट आहे म्हटल्यावर नाटक आलेच. नाटक म्हटल्यानंतर पाहुणे आले आणि पाहुणे म्हटल्यानंतर पाहुण्यांचे मेजवानी आलीच. आणि विशेष बाब अशी की शंकरपट, नाटक म्हटल्यानंतर लग्न जुळण्यासाठी मुले आणि मुली पाहण्याचा एक आगळावेगळा कार्यक्रम यानिमित्ताने साधला जायचा.            खरिपाच्या हंगामातील धानपिकाची मळणी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापर्यंत चालू राहायची. याला कारण असे होते की, पूर्वी ट्रॅक्टर, मळणी यंत्र नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील धानपिकाची कापणी झाल्यानंतर धानाची मळणी करण्यासाठी बैलजोडी, बैलगाडीचा वापर करावा लागत होता. त्यामुळे महिनोनमहिने मळणी चालायची. मळणी करून धानरास घरी येईपर्य...