आई 'अस्मिता'च्या 'आकांक्षा'ला हवी मदत
आनंद आणि अस्मिता यांच्या सहजीवनातुन उमललेली आकांक्षा हि पंधरा वर्षांची मुलगी. आई-वडिलांच्या लाडक्या आकांक्षाची सहा दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडली. डोक्यात दूखतेय एवढेच कारण ती सांगायची. लागलीच ब्रम्हपुरीच्या खाजगी दवाखान्यात उपचाराधीन असतांना परत काल-परवा तिने डोळे उघडणे, बोलणे बंद केल्याने नागपूरच्या शासकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले. उमलत्या किशोरवयात नवस्वप्न उराशी बाळगणाऱ्या आकांक्षाच्या आयुष्याचे गगन ठेंगणे होऊ पाहत आहे. तेव्हा देसाईगंज तालुक्यातील कसारी (तूकूम) या गावची रहिवासी आकांक्षा आनंदराव नेवारेचे आयुष्य उंच करण्यासाठी तीला तत्काळ उत्तम अशा वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदतीची गरज आहे. आज मदर्स डे आहे. त्यानिमित्ताने आई अस्मिताच्या आकांक्षाला मदत करण्याची नितांत गरज आहे. देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर विसोरापासून अवघ्या दहा किमी अंतरावर कसारी (तूकूम) हे यशवंत गाव वसलेले आहे. याच यशवंत गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेल्या आनंदराव नेवारे यांचा कुटुंब राहतो. आनंदराव यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी आकांक्षा...