आई 'अस्मिता'च्या 'आकांक्षा'ला हवी मदत
आनंद आणि अस्मिता यांच्या सहजीवनातुन उमललेली आकांक्षा हि पंधरा वर्षांची मुलगी. आई-वडिलांच्या लाडक्या आकांक्षाची सहा दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडली. डोक्यात दूखतेय एवढेच कारण ती सांगायची. लागलीच ब्रम्हपुरीच्या खाजगी दवाखान्यात उपचाराधीन असतांना परत काल-परवा तिने डोळे उघडणे, बोलणे बंद केल्याने नागपूरच्या शासकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले. उमलत्या किशोरवयात नवस्वप्न उराशी बाळगणाऱ्या आकांक्षाच्या आयुष्याचे गगन ठेंगणे होऊ पाहत आहे. तेव्हा देसाईगंज तालुक्यातील कसारी (तूकूम) या गावची रहिवासी आकांक्षा आनंदराव नेवारेचे आयुष्य उंच करण्यासाठी तीला तत्काळ उत्तम अशा वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदतीची गरज आहे. आज मदर्स डे आहे. त्यानिमित्ताने आई अस्मिताच्या आकांक्षाला मदत करण्याची नितांत गरज आहे.
देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर विसोरापासून अवघ्या दहा किमी अंतरावर कसारी (तूकूम) हे यशवंत गाव वसलेले आहे. याच यशवंत गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेल्या आनंदराव नेवारे यांचा कुटुंब राहतो. आनंदराव यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी आकांक्षा शाळा शिकण्यासाठी मामेगाव विसोरा येथे असते. तिने नुकतीच इयत्ता नववीची वार्षीक परीक्षा दिली. मागच्या आठवड्यात डोक्यात दुःखते म्हणून ती सांगू लागली. प्राथमिक उपचारासाठी आकांक्षाला कसारी येथे नेण्यात आले. पण सोमवारी प्रकृती आणखी बिघडल्याने ब्रम्हपुरीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये अड्मिट करण्यात आले. मंगळवारी प्रकृतीत सुधारणा न होता तिने बोलणे बंद केले. डोळे बंद केले. अखेर काल (शुक्रवारी) रात्री बारा वाजता नागपूरला दाखल केले. आकांक्षाला अधे मधे तीव्र झटके येतात तर डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे की मेंदूला रक्त पुरवठा होत नसावा आणि मेंदूवर सूजन असावी.
शुक्रवारी रात्री उशिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (मेडिकल) येथे अड्मिट केल्यावर अजूनही तिची तब्येत गंभीर आहे. असे तिच्या वडिलांनी कळविले आहे. सध्या मेडिकलच्या आयसीयु (वार्ड नंबर 24) मध्ये तिला ठेवण्यात आले आहे. आकांक्षाचे वडील आनंदराव अल्पभूधारक शेतकरी आहेत. आई अस्मिता गृहिणी आहे. आकांक्षाच्या कुटुंबाची आर्थिक बाजू फारच बेताची आहे. आकांक्षाला जगविण्यासाठी तिला लवकरात लवकर उत्तम असे वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वैद्यकीय मदतीसाठी पाठपुरावा करण्याची अपेक्षा नेवारे कुटुंबाने केली आहे. तसेच आकांक्षाच्या प्रभावी वैद्यकीय उपचाराकरिता समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत केल्यास आकांक्षाचे आयुष्य वाढेल.
विसोरा (सीताबर्डी) येथे तिच्या मामाच्या घरी भेट दिली असता. तिची आई निशब्द झाली खरी पण आई अस्मिताचे डोळे मुलगी आकांक्षाच्या आठवणींत अश्रुंनी गदगद भरून आले. खरं म्हणजे आईची आपल्या मुलांप्रती अतीव अशी जिवापाड ममतारुपी आकांक्षा कायम असते. आणि मुलेही आईच्या मायेसाठी सदैव प्रेमरुपी आकांक्षा बाळगतात. आज मदर्स डे साजरा होत आहे. आईवरील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व्यक्त करून कृतज्ञता अर्पण करण्याचा दिवस. आजच्या दिवशी आई अस्मिताची आकांक्षा आजारातून लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावी म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया.
चला आकांक्षाला मदत करूया...
आपणांस आकांक्षा हिला आर्थिक मदत करायची असल्यास तिचे वडील आनंदराव महादेव नेवारे यांच्या बँक ऑफ इंडिया शाखा वडसाच्या बँक अकाउंटवर पैसे पाठवावे.
खाता क्रमांक- 964710510000202
आयएफएससी कोड- BKID0009647
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा