सेंद्रिय ते रासायनिक शेतीच्या प्रवासात देशी वाणांचे गमन
विसाव्या शतकातील सातव्या दशकाच्या मध्यंतरी घडून आलेल्या हरितक्रांतीने कृषिक्षेत्र चकाकून गेला. अन्नधान्याने भारत गदगद झाला. त्यासाठी सुधारित धानाच्या जातींचा सुध्दा मोठा हातभार लागला. याच सुधारित धानाच्या जातींनी ग्रामीण भागातला धानाचा पट्टा गाठला. सन १९७० च्या आसपास विसोरा परिसरातील शेतात संकरित धानाच्या वाणाने प्रवेश केला. जास्त उत्पादकता, रोग प्रादुर्भाव कमी असल्यामुळे संकरित वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आणि पाहता पाहता पारंपरिक धानाचे जुने वान धानाच्या कोठारातून हळूहळू गायब होत गेले. नैसर्गिक तसेच मानवी पर्यावरणीय बदलाच्या प्रवासात सेंद्रिय शेतीने रासायनिक शेतीचे रूप धारण केले. मशागतीसाठी पारंपरिक साधनांच्या जागी आधुनिक यंत्रांनी जागा घेतली. त्यामुळे काळानुसार कमी उत्पादन, कमी पैसा मिळवून देणारे, रोग-किडिला बळी पडणारे पारंपरिक धानाचे वाण जास्त उत्पादन, जास्त पैसा मिळवून देणाऱ्या संकरित वाणाच्या गर्दीत दिसेनासा झाला. चवदार आणि पौष्टिक असूनही धानाचे जुने वाण आता लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. या पारंपरिक सूक्ष्मअन्नद्रव्यांनीयुक्त असलेल्या दे...