पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रावणातली भजन-गायन परंपरा देतेय आध्यात्मिक ऊर्जा

श्रावण मासात सण-उत्सवांना उधाण येतो. निसर्ग, मानवासह अन्य प्राणी आणि वनस्पती यांच्यातील नैसर्गिक बंधन अधिक घट्ट करणारे सण श्रावणात येतात. मनुष्य हा निसर्ग, प्राणी आणि वनस्पती यांची भाव-भक्तीने पूजा-अर्चा वंदन करून नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळगौरी, जन्माष्टमी, बैल पोळा हे सण मोठ्या आनंदात साजरे करतो. आध्यात्मिक, धार्मिक भावना वृद्धिंगत करणाऱ्या या श्रावण महिन्यामध्ये खेड्यापाड्यात पिढ्यानपिढ्या अभंग, भजन, गौळण गायनाची अनोखी, गौरवशाली परंपरा आजही सुरू आहे. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर, विसोरा येथे शंभरावर वर्षांपूर्वीपासून ही परंपरा कायम असून सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव तेवत ठेवण्यात मोलाचे कार्य करीत आहे.                   पूर्वी गावात मनरंजन वा जनरंजन करण्याची आजच्या सारखी टीव्ही, मोबाईल, अँप्स अशी हजारो साधने नव्हती. त्यावेळी मानवी समाजातील काही हौशी लोकच आवडीने छंद जोपासून स्वतःसह सर्वांचे करमणूक करीत असत. मराठी वर्षातील गुढीपाडवा ते होळी पर्यंतचा प्रत्येक सणवार धार्मिकता जोपासणारा असल्यामुळे लोकांच्या भावविश्वात त्यांना विशेष स्थान आहे. त...

एका हाताने काढायचा पऱ्हा तर दुसऱ्या हाताने खायचा भाकर

जन्मापासून घरात कमी आणि शेतात जास्त बालपण गेल्यामुळे त्यात शिक्षणाचा तर गंध नाहीच परिणामी शेतीवर इतका प्रेम कि प्रसंगी ऊन, वारा, पाऊस, थंडी यातल्या कशाचीही कसलीच तमा न बाळगता इथला शेतकरी रात्रंदिवस शेतीत राबायचा. धानपीक शेती म्हणजे इथल्या लोकांच्या वितभर पोटाला शांत करणाऱ्या अन्नाचा (भाताचा) जणू कारखानाच. तेव्हा खरीप हंगामातील रोवणीच्या सिझनात खाणेपिणे विसरून आपल्या शरीराचा घाम न घाम बळीराजा मातीत अर्पण करायचा. होय, बळीराजा एका हाताने रोवणीसाठी धानपीक पऱ्हा काढायचा तर दुसऱ्या हाताने भाकरीचा तुकडा तोंडात भरायचा. आजपासून पन्नास-साठ वर्षांपूर्वीपर्यंतच्या शेतशिवारातच ज्यांचे अख्खे आयुष्य गेले अशा कणखर मनाच्या आणि दणकट शरीराच्या शेतकऱ्यांची ही खरीखुरी आणि अचंबित करणारी गोष्ट.               विसोरा गावातल्या जिल्हा परिषद शाळेत सन 1955 ला पाचवा वर्ग सुरू सुरू झाला तेव्हा सहा-सात वर्षाचा असणाऱ्या सलंगटोली येथील मधुकर हनाजी बुद्धे यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला असता त्यांनी थेट सहा-सात दशकांपूर्वीच्या शेती आणि शेतकरी यांच्या विश्वातील जुन्या आठवणींना उजाळा दिल...