विसोऱ्यात 136 वर्षांपूर्वीचा इंग्रजकालीन नाणा
वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी सर्वमान्य चलनव्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यातूनच नाणे, नोटा अस्तित्वात आल्या. भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी ब्रिटिश शासकाची चित्रे आणि नावे असलेली नाणे प्रचलित होती. स्वातंत्र्यानंतर ती सर्व नाणी चलनातून बाद होऊन लुप्त झाली. मात्र विसोरा येथील एकनाथ बुधाजी बुद्धे या कवीमनाच्या व्यक्तीने आजपासून तब्बल 136 वर्षांपूर्वीचे इंग्रजकालीन नाणे आपल्या घरी जपून ठेवले आहे. हे विशेष!
भारत स्वातंत्र्यहोण्यापूर्वीच जन्मलेल्या एकनाथ बुद्धे यांना जुने नाणे, वर्तमानपत्राचे कात्रणे, चित्रपट गीतांच्या वह्या जमा करण्याचा अनोखा छंद आहे. त्याच छंदातून त्यांच्या सदन असलेल्या पूर्वजांच्या निमित्त्याने घरी एकोणिसाव्या शतकातील 1885 साली चलनात असलेले दोन आण्याचे नाणे आहे. त्यावर इंडिया व्हिक्टोरिया राणी असे नाव छापले असून राणीचे छायाचित्र पण आहे. तसेच 1908 सालचे एडवर्ड सातवा राजा आणि सम्राटचे छायाचित्र असलेले एक रुपी ज्यात डोक्यावरील मुकुट चिन्ह छापले आहे. वन क्वार्टर आणा इंडिया 1917 जॉर्ज पाचवा राजा, एक रुपये 1918 जॉर्ज पाचवा राजा, हाफ (अर्धा) रुपये 1918 जॉर्ज पाचवा राजा, 1919, 1926, 1939 अर्धा रुपये, 1940 जॉर्ज सहावा राजा, जॉर्ज सहावा राजा 1/4 रुपये 1943, जॉर्ज सहावा राजा अर्धा आणा (दो पैसा) 1946, एक आणा जॉर्ज सहावा 1947, दो आणा जॉर्ज सहावा 1947, एक रुपया जॉर्ज सहावा राजा 1947 ही दुर्मिळ आणि जुनी नाणी आहेत. यामध्ये वेगवेगळ्या आकाराची, मजकूर असलेली, विविध धातूंची तसेच स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील नाणीही संग्रही आहेत.
नाण्यांवर छापलेल्या राजाचे नाव, छायाचित्र, चिन्ह, वर्ष यांवरून तत्कालीन इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तसेच प्रत्येक नाण्याच्या परिघात सुंदर, आकर्षक डिझाईन तसेच सिंह, वेगवेगळे फुले दिसतात. काही चौकोनी तर बहुतेक गोलाकार नाणे आहेत. ब्रिटिशकाळात धनाढ्य कुटुंबातील लहान मुले-मुली, स्त्रिया तेव्हाच्या काळात चलनात असलेल्या नाण्यांपासून माळ तयार करून गळ्यात घालत. विसोरा येथे अनेक कुटुंबात अशी दुर्मिळ नाणी असल्याचे कळते. आता हे नाणे दुर्मिळ झाली असल्याने त्यांचे जतन आणि संवर्धन होणे काळाची गरज. अन्यथा भावी पिढीला पुस्तकातील फोटोमधूनच जुने नाणे पहायला मिळतील.
विशेष म्हणजे दोन नाणे खुप जुने असल्याचा अंदाज आहे. त्यावरील भाषा इंग्रजी नाही. दोन्ही नाण्यांच्या दोन्ही बाजू जुनी झाल्याने अस्पष्ट झाली आहेत. त्यावर नेमके काय लिहलेले आहे. ते कळत नाही. रसायन वापरून स्वच्छ केल्यास नाणे कोणत्या काळातील आहेत ते कळू शकेल. एकनाथ बुद्धे हे झाडीबोली भाषेत कविता सुद्धा लिहितात. सध्या एकनाथ बुधाजी बुद्धे यांचे नातू पंकज बुद्धे या बहुमूल्य नाण्यांची काळजी आणि देखभाल करतोय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा