पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंतप्रधानांचे लग्न सोडून राष्ट्रसंत आंधळीत

गावखेड्यातील जनकल्याणातून अख्ख्या राष्ट्र, जगाच्या समृद्धतेची व्यापक अशी कृतीयुक्त दूरदृष्टी बाळगणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आजपासून तब्बल 70 वर्षांपूर्वीच घनदाट अशा झाडीच्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या आंधळी गावात राष्ट्रसंत सतत सतरा वर्षे आले. राष्ट्रसंतांचे परमभक्त हरीराम खुणे यांच्याशी जुळलेल्या ऋणानुबंधापोटी राष्ट्रसंत आंधळी येथे येऊन भजन करायचे. आज सत्तर वर्षांनतरही आंधळी गाववासीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता दररोज स्मरण करून त्यांच्या विचारांची स्मृती निरंतर वाहतात.               आईच्या गर्भात असतांनाच वडिलांचा मृत्यू झाल्याने वडिलांच्या प्रेमाला कायमचा मूकलेल्या आंधळी निवासी हरीराम खुणे यांचे बालपण बोळधा (बाराभाऊ) त गेले. तसेच शिक्षण ब्रम्हपुरी येथे झाले. हरीराम यांना गोड आवाज लाभल्याने ते भजन गायन उत्तम करायचे. त्याच अंगभूत गुणांनी राष्ट्रसंत यांच्याशी ओळख झाली. पुढे हीच ओळख इतकी घट्ट झाली कि हरीराम खुणे हे राष्ट्रसंत यांच्या भजनी मंडळात सहभागी झाले.    ...

जागृत देवस्थान आमगावचे राममंदिर

प्रभू श्रीरामावर अपार श्रध्दा आणि जिवापाड प्रेमाखातर बजरंगबली हनुमानाने अथांग सागरात सेतू बांधला. इकडे गडचिरोली जिल्ह्यातील आमगावच्या जंगलात आजपासून तब्बल शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ब्रिजलाल पालीवाल या रामभक्ताने श्रीरामाप्रती असलेल्या श्रद्धेपोटी राममंदिर बांधला. आमगावच्या राममंदिरातून सेठ ब्रिजलाल यांनी उभारलेला रामभक्तीचा सेतू आणखी घट्ट होऊन सूदूर प्रसिद्ध झालाय. त्यामुळे दरवर्षी रामनवमी निमित्त जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील रामभक्त रामजन्मोत्सवाला आमगाव येथे श्रीरामाचा जयजयकार करण्यासाठी येतात.             आमगावचे रहिवासी, श्रीराम मंदिर आमगाव ट्रस्टचे सदस्य तथा माजी जि. प. सदस्य वसंतराव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमगावच्या पूर्वेकडील घनदाट जंगलात राखडे महाराज यांचे वास्तव्य होते. ते सिद्धपुरुष होते. महाराजांची ख्याती खामखूरा (ता. अर्जुनी/मोरगाव, जि. गडचिरोली) येथील सेठ ब्रीजलाल पालीवाल यांच्यापर्यंत पोहचली. पालीवाल यांनी राखडे महाराज यांची आमगाव येथे भेट घेतली. पुढे राखडे महाराजांच्या सांगण्यानुसार पालीवाल यांनी आमगावचे तेव्हाचे मालगुजार केशवर...