दमा रुग्णांचा मुक्तीदाता वैद्यराज कावळे
मनात प्रामाणिकपणा आणि कसलाही स्वार्थ न बाळगता केलेली जनसेवा मानवास यशोशीखर गाठण्यास सदैव प्रेरणा देते. याच भावनेतून कोकडीचे वैद्यराज प्रल्हाद सोमाजी कावळे तब्बल 40 वर्षांपासून दमा रुग्णांना निःशुल्क औषध देतात. विशेष म्हणजे ही औषध मासोळीमधून देतात आणि फक्त मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी दिली जाते. परंतु गेल्या वर्षी आणि यंदाही कोविड-19 च्या प्रादुर्भावाने जनहिताच्या दृष्टीने त्यांनी दमा औषध वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोकडी या गावी वैद्यराज प्रल्हाद सोमाजी कावळे दमा रोगावर मासोळीतून औषध वितरित करतात. गेली 40 वर्षे सातत्याने कोकडीचे वैद्य कावळे निःशुल्क दमा रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करीत आहेत. आजपर्यंत लाखो दमा रुग्णांना त्यांनी दमा औषध दिली आहे. सलग तीन वर्षे औषध घेणे आवश्यक आहे. आजपर्यंत अनेक रुग्णांना दमा रोगातून मुक्त केल्याचे ते सांगतात. अल्पशिक्षित वैद्य प्रल्हाद कावळे गडचिरोली सारख्या जिल्ह्याच्या एका खेडेगावात र...