विसोऱ्यात 136 वर्षांपूर्वीचा इंग्रजकालीन नाणा
वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी सर्वमान्य चलनव्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यातूनच नाणे, नोटा अस्तित्वात आल्या. भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी ब्रिटिश शासकाची चित्रे आणि नावे असलेली नाणे प्रचलित होती. स्वातंत्र्यानंतर ती सर्व नाणी चलनातून बाद होऊन लुप्त झाली. मात्र विसोरा येथील एकनाथ बुधाजी बुद्धे या कवीमनाच्या व्यक्तीने आजपासून तब्बल 136 वर्षांपूर्वीचे इंग्रजकालीन नाणे आपल्या घरी जपून ठेवले आहे. हे विशेष! भारत स्वातंत्र्यहोण्यापूर्वीच जन्मलेल्या एकनाथ बुद्धे यांना जुने नाणे, वर्तमानपत्राचे कात्रणे, चित्रपट गीतांच्या वह्या जमा करण्याचा अनोखा छंद आहे. त्याच छंदातून त्यांच्या सदन असलेल्या पूर्वजांच्या निमित्त्याने घरी एकोणिसाव्या शतकातील 1885 साली चलनात असलेले दोन आण्याचे नाणे आहे. त्यावर इंडिया व्हिक्टोरिया राणी असे नाव छापले असून राणीचे छायाचित्र पण आहे. तसेच 1908 सालचे एडवर्ड सातवा राजा आणि सम्राटचे छायाचित्र असलेले एक रुपी ज्यात डोक्यावरील मुकुट चिन्ह छापले आहे. वन क्वार्टर आणा इंडिया 1917 जॉर्ज पाचवा राजा, एक रुपये 1918 जॉर...