40 वर्षांचा झाला विसोराचा तान्हा पोळा उत्सव
वर्षातील एकमेव असा सण ज्यात बालकांच्या आनंद आणि सहभागाला सर्वोच्च स्थान असते. बैलाच्या भगीरथ कष्टाला पूजन करून प्राणी आणि मानवाच्या नातेसंबंधात अधिकचा जिव्हाळा निर्माण करण्याचे सण म्हणजे बैल पोळा आणि तान्हा पोळा सण. बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बालके लाकडी नंदी बैल सजवून त्याची पूजा करतात. आणि गावभर मिरवणूक काढतात. तान्हा पोळा सणाला बालकांकडून नंदी बैलाच्या निमित्त्याने बैलांची मनोभावे पूजन, वंदन, सन्मान केला जातो. केवळ तीन नंदी बैलांच्या साक्षीने आरंभलेला विसोरा गावचा तान्हा पोळा उत्सव आज (27 ऑगस्ट 2022) तब्बल 40 वर्षांचा झाला. गेली चार दशके पाहलेल्या विसोराच्या तान्हा पोळ्याने गावात बंधुता, एकात्मता आणि आपुलकीचा वसा जोपासला आहे. विसोराचे रहिवासी माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुखदेव मुंडले यांनी आपल्या मुलाच्या हट्टाला होकार देत लव्हा वाघाडे गुरुजी, किसन राऊत, बक्षी गूरूनूले, मारोती सुंदरकर यांच्या सहकार्याने सन 1983 साली तान्हा पोळा उत्सव सुरू केला. फक्त तीन नंदी बैल सजवून तीन मुलांच्या आनंदात लव्हा गुरुजीचा आवाज त्याला बक्षी गूरूनूले यांनी...